दहशतवादाविरोधात हिंदू-मुस्लिमांनी एकत्र लढावे   

गुवाहाटी : हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन दहशतवादाचा सामना केला पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांना आता धडा शिकवला पाहिजे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले. 
 
होजई येथे पंचायत निवडणूक फेरीला संबोधित करताना सरमा म्हणाले, यापूर्वी दहशतवाद्यांनी ज्यांना लक्ष्य केले त्यांची धार्मिक ओळख कधीच विचारली नाही; परंतु पहलगाममध्ये पीडितांना ते कोणत्या धर्माचे आहेत हे विचारले गेले.
 
त्यामुळे हिंदूंनी आता संघटित राहावे. आपण एकजूट राहिलो तरच सुरक्षित राहू. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.आसाममध्ये राहणारे काही लोक अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. अशा व्यक्तींनाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणीही असो, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Articles